कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या "सांग सांग भोलानाथ" ह्या सर्वश्रुत असणाऱ्या बालगीताच्या धरतीवर, तरुणांसाठी एखादे "बालगीत" रचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न....
सांग सांग भोलानाथ...
सांग सांग भोलानाथ, ती माझी होईल काय ?
हातामध्ये हात देऊन सोबत येईल काय ?
सांग सांग भोलानाथ ॥ध्रु॥
भोलानाथ, तिची-माझी गट्टी होईल काय ?
तिच्या इतर मित्रांची 'छुट्टी' होईल काय ?
भोलानाऽऽथ भोलानाऽऽथ ॥ध्रु॥
भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदाऽऽ
होईल का रे, ती मज कृष्णाची राधा ?
भोलानाऽऽथ भोलानाऽऽथ ॥ध्रु॥
भोलानाथ, "वेलेंटाईन्स डे" आलाय जवळ
तिच्या मनी माझ्याप्रती खुलेल का रे कमळ ??
भोलानाऽऽथ भोलानाऽऽथ ॥ध्रु॥
- श्रीयुत पन्त