पद्मविभूषण

२००८ साली दिल्या गेलेल्या पुरस्कारांत पद्मविभुषण हा सर्वोच्च पुरस्कार होता. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती ह्या आपापल्या क्षेत्रात निश्चितच अतिशय उच्च स्थानी आहेत. या चर्चाप्रस्तावाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा आपण घेऊ शकतो. या चर्चेच्या निमित्ताने त्यांच्याबद्दलच्या कथा, परिचय इ. वर मनोगती प्रकाश टाकतील अशी अपेक्षा आहे.

२००८ पद्मविभुषण विजेते व त्यांचा मोजक्या शब्दांत परिचय :

१) सचिन तेंडुलकर : जगप्रसिद्ध सन्माननीय क्रिकेटपटू [महाराष्ट्र]
२) विश्वनाथन आनंद : जगज्जेता भारतीय बुद्धिबळपटू [तमिळनाडू]
३) नारायण मूर्ती: इंन्फोसिसचे संस्थापक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यावसायिक [कर्नाटक]
४) आर. के पचौरी: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यावरणतज्ञ (नोबेल विजेत्या टीमचे सभासद) [अनिवासी]
५) इ. श्रीधरन : कोंकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रोचे जनक [दिल्ली]
६) लक्ष्मी मित्तल : जागतिक ख्यातीचे पोलाद व्यावसायिक , ब्रिटिश नागरिक [लंडन]
७) न्यायाधीश (डॉ.)ए.एस. आनंद: भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश [दिल्ली]
८) श्री पी. एन्. धर :  धडाडीचे केंद्रीय शासकीय अधिकारी, सिमला कराराबाबतच्या घडामोडींत सहभाग [दिल्ली]
९) पी आर एस्. ओबेरॉय : ओबेरॉय ग्रुपचे संस्थापक [अनिवासी]
१०) आशा भोसले: भारतीय लोकप्रिय सदाबहार गायिका [महाराष्ट्र]
११) सर एडमंड हिलरी: पहिले एव्हरेस्टवीर, हिमालयात शेर्पांसाठी समाजसेवी कार्य, न्यूझीलंडचे नागरिक [ऑकलंड]
१२) रतन टाटा: टाटा ग्रुपचे संस्थापक आणि जगप्रसिद्ध व्यावसायिक [महाराष्ट्र]
१३) प्रणव मुखर्जी: भारतीय राज्यसभेतील बुजुर्ग संसदपटू, मंत्री. [प. बंगाल]

आपणाला यातील बर्‍याचश्या व्यक्तींबद्दल जी माहिती असेल ती कृपया इथे द्यावी. ज्यांच्या बद्दल नाही त्यांच्या बद्दल मिळावी आणि ज्यांबद्दल आहे त्यांच्या बद्दल वाढावी हा या चर्चेमागील प्रामाणिक उद्देश.

कृपया या व्यक्तींबाबत टिप्पणी करते वेळी शक्य असल्यास संदर्भाचा दुवा असल्यास द्यावा. जेणेकरून उत्सुक मंडळी तिथे जाऊन तपशील वाचतील. पण केवळ दुवा न देता त्यातील तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटलेला भाग इथे मराठीत द्यावा ही विनंती

संदर्भ वरील नावे विकिपिडिया वरून घेतलेली आहेत.