सांगण्यासारखं काही नाही
सांगण्यासारखं खूप काही
जीवन मुकं हे वाटेल पण
बोलण्यासारखं खूप काही
होत नाही आकलन इथं
गोंधळल्यासारखं सर्व काही
लहान लहान क्षण-प्रसंगातून
जगण्यासारखं खूप काही
सुख इथं फार मोठं
सुख इथं काही नाही
खूप खोल निराशेची खाई
आकाशाला सीमा नाही
कितीही प्रयत्न केला 'जीवाने'
जीवन बोलून सांगू शकत नाही
ओठांमागे अडकलेल्या शब्दांचा
आवाज अंतःकरणात घुमत राही
दुवा क्र. १