उंदीयो

  • मिश्र भाज्या ३/४ किलो (वांगी, छोटे बटाटे, रताळी, कच्ची केळी चार
  • भागात कापून, तोडलेल्या वालाच्या शेंगा, मटाराची दाणे, फ्लॉवरचे तुरे
  • उकडलेले ओले तुरीचे दाणे, बारीक चिरलेले टमाटे, बारीक चिरलेला
  • हिरव्या लसणाची पात)
  • भरायचा मसाला: २ मोठे चमचे बेसन, आमचूर, मीठ, साखर, तिखट चवीनुसार, २ टी
  • स्पून धन्याची पूड, १ टीस्पू जीऱ्याची पूड मुठीया१ पाव बेसन, २ वाट्या बारीक चिरलेली मेथी, हळद, मीठ, तिखट, साखर, २टीस्पू
  • धन्याची पुड, १टीस्पू जीरापूड, चिमूटभर सोडा २ टीस्पू तेल
  • मसाले: ३ टीस्पू धन्याची पूड, १ टीस्पू जीरापुड, हळद, मीठ, तिखट,
  • १ टीस्पू गरम मसाला
  • फोडणीची साहित्य: २ चमचे तेल, मोहरी, हिंग
४५ मिनिटे

मुठीयाचे साहित्य एकत्र करून पाण्याने घट्टसर भिजवून मुटके वळून एक प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवून त्यावर पाणी शिंपडून ३ मि. १००% पॉवरवर माइक्रोवर ठेवा. थंड झाल्यावर कापून तेलाचा ब्रश फिरवून ४ मि. ग्रिल करा. मसाला भाजीत भरा. एका मोठ्या प्लॅस्टिकच्या भांड्यात सगळ्या भाज्या, मसाला घालून १००% पॉवरवर पाणी शिंपडून ८ मि. माईक्रो करा. २ मि. आधी मुठीये घाला. मधून मधून भाजी हलवून घ्या.फोडणी व २ वाट्या पाणी घालून १ मि. माईक्रोवर ठेवा. १० मि. तसेच भट्टीत राहू द्या. कोथंबीर घालून वाढा.

सुक्ष्मलहर भट्टीत कमी तेलात व कमी वेळात तयार होते.

अनिता