डोंबिवली येथील काव्यरसिक मंडळ या कवितेला वाहिलेल्या संस्थेचे ४२ वे वार्षिक स्नेहसंमेलन दि १६-१७ फेब्रुवारी रोजी आंबेडकर हॉल,नगरपालिका इमारत,डोंबिवली (पूर्व) येथे संपन्न होत आहे.
या निमित्ताने रविवार दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता 'ऋतु गझलांचा' हा मराठी गझलांचा मुशायरा आयोजीत केला आहे. यात वैभव जोशी,चित्तरंजन सुरेश भट,प्रसाद शिरगावकर,प्रमोद खराडे,संदीप माळवी व संमेलनाध्यक्ष श्री. इलाही जमादार गझला सादर करणार आहेत.
हा कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती.
संपर्कः जयंत कुळकर्णी ९८२०६३४८०९ आनंद पेंढारकर ९३२४८०३२१२