प्राचीन भारतीय खगोलशास्त्र

१२०० वर्षांचे कलियुग संपण्यापूर्वीच कलियुगाप्रमाणेच सर्व युगांची वर्षे ३६० ने गुणून वाढविण्यात आली.त्यामुळे लोकास रामायण लाखो वर्षांपूर्वी झाले असे वाटू लागले.

परंतू हे लक्षात घेतले पाहिजे की वर्षे वाढविण्यापूर्वीच रामायण व महाभारत घडले आहे.

श्रीरामजन्म ६ जानेवारी इ.पू. ५६४८,(ग्रेगरीयन)चैत्र शुक्ल ९ या दिवशी झाला असे मी सिद्ध केले आहे.

बहुतेक संगणक प्रोग्राम मध्ये या तारखाची तिथी बरोबर दिसत नाही कारण ज्यानी

ते बनविले त्याना भारतीय इतिहास माहित नाही.(भाग १ च्या लेखात सांगितलेली ३ कारणे)

बहुतेक प्रोग्राम ज्युलियन तारखेवर चालतात.परंतू ज्युलियन तारखा वापरल्यास १९

फेब्रुवारी ५६४९ बी‌सी.इ. तारीख वापरावी लागेल.(५६४८इ.पू.=५६४९ बी‌‌. सी.इ.कारण

संगणकात ० इ.पू. किन्वा ० ए. डी. वापरत नाही.)डेल्टा टी २ दिवस असल्यामुळे

संगणकात १७ फेब्रुवारी ५६४९ बी‌. सी.इ. तारीख टाकून ग्रहस्थिती बघावी लागेल.पण

ते ग्रह १९ फेब्रुवारीचे असतील.