ऑनलाईन पैसे कमवा

सध्या ऑनलाईन पैसे कमवा, घरबसल्या लाखो रुपये कमवा. या विषयीच्या बऱ्याच जाहिराती वर्तमानपत्रामध्ये पहायला मिळतात.

उदा.  दुवा क्र. १ (गुगल कॅश कि) आणि  दुवा क्र. २ (गुगल कॅश काऊ)

गुगलच्या जाहिरातींद्वारे दिवसा हजारो रुपये कमवा. अशा स्वरुपाची माहिती सांगणाऱ्या या वेबसाईट नक्किच फसवणूक करतात असे मला वाटते.

असो, विषय असा आहे, की या अशा वेबसाईटद्वारे साधारण रु १०००-२००० ला मेंबरशीप देतात व त्याबदल्यात CD देतात आणि त्यांच्या वेबसाईटवर मेंबरशीप देतात.

अशा प्रकारे जर कुणी या व यासारख्या इतर कुठल्यातरी वेबसाईटद्वारे मेंबरशीप घेतली असल्यास आपला अनुभव कळवावा. जेणे करून जर आपली फसवणूक झाली असल्यास इतरांना त्याची माहिती मिळेल आणि जर खरच एखादी कंपनी चांगल्याप्रकारे सहकार्य करीत असेल व त्याचा आपणास फायदा झाला असेल तर इतरांनाही त्याचा फायदा होईल.

आपली माहिती नक्कीच इतरांसाठी उपयोगी ठरेल.

- झाले माझे बोलून

धन्यवाद.