प्राचीन भारतीय खगोलशास्त्र ६

रामायणाप्रमाणेच महाभारतामध्ये व्यासानी खगोलविषयक अनेक वर्णने केली आहेत.ती खरी आहेत.महाभारतयुद्ध १० सप्टेंबर इ.पू.३००८ ,ग्रेग्ररीयन( ५ आक्टोबर ज्युलियन)कार्तिक अमावस्येस सुरू झाले.त्या दिवशी सकाळी सूर्य ऊगवतानाच २१३.३३ अंशावर(विशाखा/अनुराधा) सूर्य/चंद्र असता सूर्यग्रहण झाले. राहू २११ वर होता.त्यापूर्वीच्या कार्तिक पौर्णिमेस चंद्रग्रहण होते.युद्ध १४ आक्टोबर रोजी श्रवण नक्षत्री मार्गशीर्ष  शु. ४ रोजी संपले.(मध्ये अधिक महिना होता.)येथे डेल्टा टी १ दिवस असल्याने संगणकात ४ आक्टोबर ३००९ बी. सी.ई. ज्युलियन बघावे लागेल.मी कॅल्क्युलेटरवर सर्व गणिते केली आहेत.ती पुस्तकात दिली आहेत.या दिवसाशिवाय वनवासाच्या प्रारंभापासून भीष्मनिधनापर्यंत (१८ डिसेंबर ,माघ शु.८,रोहिणी नक्षत्र) सर्व तारखा,गणिते,श्लोक दिले आहेत.