आमची प्रेरणा मिलिंद फणसेंना शीर्षक न सुचलेली गझल.
लाटणे जरी मी तुझे चुकवले होते
दारावर अमुचे तोंड अपटले होते
साक्षीस ठेव हे दात दोन पडलेले
तू मुळात ज्यांना जरा हलवले होते
राहिल्यात मागे स्मृतिपोकळ्या आता
ते घाव मी जरी सर्व विसरले होते
'ते' दुरावल्याचे दुःख कराया हलके
मी मुखात नकली दात बसवले होते
लीलया चघळले कर्वे मी जीवनभर
ते ऊस सोलणे परी न जमले होते
भ्रम,"केश्या"ला विडंबन आवडल्याचा
रे खुळ्या, तुला हे लोक हासले होते !