प्राचीन भारतीय खगोलशास्त्र ७

मागील भागांवरून असे दिसून येईल की भारतीयांना कृतयुगापासून खालील गोष्टी माहीत होत्या.

१) सूर्य,चंद्र,बुध,शुक्र,मंगळ,गुरू,शनी,राहू ,केतू व यांच्या गती.

२)२७ नक्षत्रे व १२ राशी

३)वरील ९ ग्रहांची स्थाने नक्षत्रात/राशीत ठरविणे व त्याची नोंद करणे.

४)कालमापन : तिथी,शुक्ल/कृष्ण पक्ष, चांद्र्मास,चांद्रवर्ष,सौरवर्ष,अधिक मास,युगे.

५)वसंतसंपातबिंदू,शरदसंपातबिंदू,उत्तरायणबिंदू व दक्षिणायनबिंदू व त्यादिवशी तिथी.

६)सूर्यग्रहण ,चंद्रग्रहण व राहू/केतूचा उपयोग

७)धूमकेतू ,उल्कापात

८)अयनचलन

९) चंद्राच्या कला व उगवण्याच्या वेळा

१०)ग्रहांचे वक्री/मार्गी होणे

११)वसंत,ग्रीष्म,वर्षा,शरद,हेमंत,शिशीर व निसर्गात पडणारा फरक,निसर्गावरून काळ

ठरविणे

१२) एकाद्या दिवशी आकाशातील ग्रह /तारकांचे अचूक वर्णन करणे.

रामायण /महाभारतातील ग्रहांची वर्णने ही निव्वळ निरयन पद्धतीची असून ती केवळ

खगोलशास्त्रीय निरीक्षणांची वर्णने आहेत.त्यात फलज्योतिष्य नाही‍‍. जसे आकाश दिसले

तसेच अचूक वर्णन केले आहे.(त्यात सायन नाही.)

प्रफुल्ल  (फोनः ०२५१ २२०९४७६)