एक होत राजा...

पूर्वी गोष्टीची सुरवात अशी होत असेः एक होता राजा. त्याला दोन राण्या होत्या.एक आवडती होती व दुसरी नावडती होती.....इत्यादि.....

आता राजा म्हटल्यावर काय कमी असणार? पण प्रेम मात्र त्याला समान वाटून देता येत नसावे.आता लोकशाही म्हटली तरी थोडीफार तशीच परिस्थिती आहे.कोणताही पक्ष म्हटला तरी वरपासून गल्लीपर्यंत एक हितसंबधियांची साखळी तयार होते.त्यात जाउन बसतात ते आवडते होतात. जे तत्त्वाने वागण्याचा प्रयत्न करतात ते बाजूला पडून नावडते होतात.आवडत्यांमध्ये एवढी मजबूत संपर्क प्रणाली निर्माण होते की ते जळी ,काष्ठी,पाषाणी एकसारखे मोबाईलवरून फोन करून एकमेकांना काहीतरी सांगत असतात.नावडत्यांना काय चालले आहे ते कळत नाही.एकादा माहीती अधिकारांतर्गत अर्ज दिल्यास १ महिन्याच्या शेवटी जुजबी व बचावात्मक माहिती मिळते.नावडत्यांना सर्व सरकारी/निमसरकारी खाती अभेद्य वाटतात.आवडते मात्र नारदाप्रमाणे सगळीकडे मुक्त संचार करीत असतात व ताबडतोब काही माहितींची देवाण घेवाण करीत फिरत असतात.त्याना कोठे जावयाचे व काय करायचे याचा जणू साक्षात्कार होत असतो.नावडता एकटाच असतो.आवडत्यांच्या मात्र झूंडी फिरत असतात.अण्णा हजारे यानी माहिती अधिकार कायदा करवून घेतला.पण नोकरशाही तशीच राहणार आहे.