धावा देवाचा (भोंडल्याला शह)

देख मेरे संसारकी हालत, क्या हो गयी भगवान.

हया जुन्या हिंदी गाण्यावर आधारीत ......

कै.गीतकार प्रदीप ह्यांची क्षमा मागुन.

                       धावा देवाचा.

संसाराची माझ्या दशा ही ,अशी झाली भगवान,

कि माझ्या घरात मी मेहमान.

सूर्य-चंद्र हे नाही बदलले, बदलले नाही आसमान,

बायकोची बदलून गेली पहचान.(ध्रु)

बघा कशी हो ,ही आखडते,

भांडणही उकरून काढते,

उशीरा आलो ऑफिसातून तर,

हि देतच नाही ध्यान.

बायकोची बदलून गेली पहेचान........१

आईशी तू-तू-मी करते,

त्याचा बदला मजसी घेते,

दोस्त घरी रविवारी येता,

हि नाही करत चहापान.

बायकोची बदलून गेली पहचान.......२

योगा, पार्लर ,जीमला जाते,

पण कमरेचा कमरा रोखू न शकते,

हे दाता,तुजपाशी माझी ,

आता एक मागणी,

बदलून माझी बायको धाड तू,

करीना वा राणी,

धाड तू करीना वा राणी.

अलकाताई.

३-४ शब्द हिंदी आलेत.क्रुपया राज ठाकरेला सांगू नका हं.