सवय

तू असताना
कविता माझी
सजीव होते,
फुलते-हसते...

तू नसताना
बंद वहीच्या
आतमधे ती
रुसून बसते...

क्षणिकच असतो
खराखुरा
सहवास तुझा...

सोबत असतो
सततच माझ्या
भास तुझा...

तू नसण्याची
तशी मला
आहेच 'सवय'...

तू नसणे हा
कवितेला
आहेच 'विषय'...