तो : दर्पणात पाहुनी सजू नकोस
वैर आमच्यात वाढवू नकोस
आरशात बिंब फक्त सापडेल
खुलवतील शब्द; विस्मरू नकोस !
जाणतो मला हळूच पाहतेस
वार कर समोरुनी; लपू नकोस
रक्तवर्ण गाल चुंबु दे खुशाल
मोकळ्या बटांस सावरू नकोस
ती : साद घालते किनार, ये भरात
सागरा, फिरून ओसरू नकोस
विरघळेल मृण्मयी तुझ्या मिठीत
पावसा, बरस; असा छळू नकोस