प्राचीन भारतीय खगोलशास्त्र ९

आधुनिक शास्त्रीय माहितीप्रमाणे १९ मार्च ई.पू. ३००० ग्रेग्ररीयन (१२ एप्रिल ज्युलियन)

रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ९ : २४ : ४१.८१४  वाजता सूर्य चंद्र युती होती.

आपल्याकडे संगणक प्रोग्रॅम असल्यास तो किती बरोबर आहे ते तपासून पाहावे.या दिवशी

स्कायमॅपप्रो मध्ये चंद्राचे स्थान ३६ अंशाने जास्त दाखविते.पण एका भारतीय प्रोग्रॅम वर

ई.पू. १०००० पर्यंत चंद्राचे स्थान बरोबर आहे.(पण राहू/केतू चे स्थान कमी दाखवितो.)

एका चुआ नावाच्या चीनी खगोलशास्त्राच्या माणसाने केप्लरचा नियम वापरून ई.पू.३०००

च्या सुमारास चांद्रमास किती होता याचे गणित करून मला पाठविले.त्यानुसारपण व्यासांचे

म्हणणे ख्ररे ठरते.याप्रमाणे रामायण व महाभारतातील चंद्राच्या वर्णनास आधुनिक शास्त्राचाच

आधार आहे.मुख्य प्रश्न चंद्राच्या व राहूच्या स्थानाविषयीच येतो कारण इतर ग्रहांची स्थाने

बहुतेक कोणत्याही प्रोग्रॅमने किंवा गणिताने जवळजवळ सारखी येतात.गेल्या २५००० वर्षात

चंद्र,राहू/केतू व इतर ग्रहांची स्थाने अचूक दाखवणाऱ्या प्रोग्रॅमची आवशक्यता आहे.

माझे पुस्तक पूर्ण वाचल्यावरच याची कल्पना येईल.