कमजोर लगाम माझ्या मनाची............

कमजोर लगाम माझ्या मनाची
मनस्वी घोडा बेलगाम दौडतो,
मन भोळॆ की बेफ़ीकीर माझे
मृगजळात मी आकंठ बुडतो

रंगवुन सुराने मी अस्मानाला
हींडतो असाच गात गाणॆ,
चांदरातीचा गंध मिसळतो
झुलती त्यावर काजळी राने

ईवलाल्या या माझ्या गीतपंक्ती
मुग्ध कलिकांसवे दरवळल्या,
बेफ़ाम झाल्या नभी तारका
नकळ्त त्याही स्वरात भिजल्या

पहाटही गीताने पुलकीत झाली
तणांवर हसती थेंब नवथर,
उधाणला तव गुलाबी वारा
नकळत करते काया थरथर

छेडले मी ओल्या वसुंधरेला
कोवळॆ तिचे अंग लाजले,
यौवनाची हीच ती चाहुल का?
वाजतात स्वरांची मंद पावले

--सचिन काकडे [फ़ेब्रुवारी २,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच "हा खेळ सावल्यांचा"