आभास

आभास
.

हिमपुष्पे उचलून घेता
मालवली तेजस आभा
थेंब थेंब बरसत धारा
सत रंगात चमकून गेल्या

क्षणात उडून गेला थवा
रंग रंगल्या हिमपुष्पांचा
स्पर्शला ना स्पर्शलासा
हाती आभास हुळहुळता

स्वाती फडणीस .................. २८-०२-२००८