वॉल्ट डिस्ने - एक जादुई जादुगार

      नुकतेच वाचनात आलेल्या "वॉल्ट डिस्ने " या  "एलिझाबेथ डॅना जेफ़" च्या पुस्तकाचा   अनुवाद , ते पुस्तक छान माहितीशीर वाटले म्हणून थोडक्यात देतेय.           

आज वॉल्ट डिस्ने  यांचे नाव जगातील सर्वात प्रसिद्द व्यक्तिंमधील एक म्हणून गणले जाते. जगभरातील लाखो लोक 'डिस्नेलँड' पाहण्यासाठी उत्सुकतेने तेथे भेट देतात तर अनेक लोकांना 'डिस्ने स्टुडिओ' ने निर्माण केलेल्या सिनेमा पाहण्यात रस असतो. अनेक ठिकाणी मिकी माउस, गुफी, डोनाल्ड डक ही डिस्ने कॅरॅक्टर्स ची चित्रे असलेले टी-शर्टस , स्वेटर्स, केकस, घड्यळे , टोप्या आपण पाहतो. परंतु डिस्नेचे हे वैभव त्याला सहज मिळालेले नाही. वॉल्ट डिस्ने  यांच्या मनात सर्वांच्य करमणुकीकरता काही केले पाहीजे असा विचार सतत होता पण तो विचार प्रत्यक्शात आणण्यासाठी अनेक वर्षे प्रचंड मेहनत व अनेक संकटांना तोंड द्यावे लागले.

       डिस्ने  चे  सर्व कॅरॅक्टर्स , सिनेमे यामागे एका सर्व-सामान्य व्यक्तिच्या आयुष्याची मेहनत आहे. एक असा माणुस ज्याची कल्पनाशक्ती आणि जिद्द जबरदस्त होती.

       मोठ्या मोठ्या कानांचा मिकी माउस आज अमेरिका व इतरत्र बराच प्रसिद्ध आहे पण वॉल्ट डिस्ने  चे कार्य या कॅरॅक्टर्स पर्यंतच सीमित नाही तर ' ऍनिमेशन' च्या जगतात डिस्ने  यांचे फार मोठे योगदान आहे. तसंच त्यांनी सर्वात प्रथम मोठ्या लांबीची ऍनिमेटेड फिल्म व कार्टून फिल्म्स ना आवाज (साउंड) देण्याचे तंत्र शोधून काढले.

      हे सर्व करताना डिस्ने ला अनेक अपयशांना सामोरे जावे लागले पण त्या सगळ्यांवर मात करून अखेर त्यांनी अनेक ' ऍकॅडमी ऍवॉर्डस' तसेच अमेरिकेतील ' प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रिडम ' नावाचा अत्यंत मानाचा पुरस्कार ही मिळ्वला.

    अनेक संकटं, अपयश अशा अनेक खस्ता खात अखेर त्यांनी आपल्य करमणुकीच्या क्शेत्रात एक जागतिक इतिहास घडवला.

मेहनत, मेहनत आणि मेहनत :

     वर्षानुवर्षे डिस्ने ने त्याच्या स्टुडिओमध्ये एक कलाकार म्हणून व स्टुडिओचा मालक म्हणून खूप श्रम केले. तो काम करताना एकाग्रतेने काम करत असे व आपल्या सहकार्यांकडून ही त्याची तितक्याच कष्टाची व मेहनतीची अपेक्शा असे. त्यातील काही सहकारी आयुष्यभर त्याच्याबरोबर एकनिष्ठतेने काम करत राहिले. पण काहींना 'प्रचंड काम व कमी पगार' ही बाब खटकली आणि ते त्याला सोडून गेले.

     पण या सगळ्यातून मार्ग काढत 'वॉल्ट डिस्ने' ने आपले कार्य चालू ठेवून त्यातून चांगल्यातले चांगले निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तन , मन ओतून काम केल्यावर त्यांतील निर्मितीचा जो काही आनंद असतो तो डिस्ने याने अनुभवला. अशक्य ते शक्य करून दाखावण्याची त्याची हातोटी लाजवाब !!

   अनेकांना त्याच्या कल्पना या वेड्या कल्पना वाटत. पण 'वॉल्ट डिस्ने ' ला त्याची कल्पना , त्याचे स्वप्न साकार  करण्यात त्याचा मोठा भाऊ ' रॉय ' , त्याची पत्नी  व मुली यांचा सतत पाठींबा मिळाला.

     डिस्ने चा स्वत: वर , स्वतः च्य कल्पनाशक्ती वर जबरदस्त विश्वास होता आणि त्या बळावरच त्याने 'डिस्नेलँड' ही अदभुत दुनियेची निर्मिती केली.