स्पर्श तुझा ओला .........

ओल्या तुझ्या स्पर्शाने
पेटला वणवा काळजात
तुझ्या श्वासांचा सुर सखे
घुमतो अजुनही अंतरात

आसुसलेल्या कीना-यासारखे
मन अम्रुत लहरींसवे वाहीले
कोरडे हे रान अंतराचे
सखे गंधात तुझीया न्हाहले

मिठीत तुझीया सखे गं
अनुभवला मी आसमंत
अथांग सागरात पार बुडालो
नकळत स्पर्शिला मी अंत

भोळ्या मनास वेड लावले
सखे तुझिया यौवनाने
सोसावे कसे स्पर्शवारे हे
सांग ईवल्याश्या या ह्रुदयाने

-सचिन काकडे [डिसेंबर १०,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच "हा खेळ सावल्यांचा"