इथवर ठिक होतं
चाळ,
काकणं,
झुमके,
बिंदी.....
आणि
आरशातली ती छबी!
नाही म्हणटलं तरी
तिचा प्रभाव पडतोच
माझ्या वरती.
अन
नाचते मी ही
फुलपंखी फुला परी
तरंगत हलकी हलकी
हे इथवर ठिक होतं.
पण मग
जडावतात कान,
नकोसे वाटतात चाळ!!
जड आहेत नाही!!
स्वाती फडणीस ................२९-०२-२००८