चला येता ना
विसरायचं विसरायचं
म्हणत राहिलं ना
की आठवणी
कमरेला बिलगून राहतात,
मला दूर सारू नकोस करून
हमसून हमसून रडतात.
रडायला लावतात.
तेव्हा त्यांना या या करून बोलवायचं.
जीवाचे कान करून
एका एका अबोल क्षणाला
मनात सामावून घ्यायचं
त्यांच्या नजरेला नजर देत,
त्यांना समजावून सांगायचं,
तुम्ही माझ्याचं
माझ्याचं राहाल.
माझ्या जवळच असाल.
चला येता ना..............
आपल्याला आता पुढं जायचंय!!.........
स्वाती फडणीस ......................................२५-०२-२००८