पेला

या पेल्यातच
कधी एकदा
आयुष्याची
दुःखे बुडवत
बसलो मी...

कडूच होता
जहरागत तो;
घोट-घोट पण
तरिही रिचवत
बसलो मी...

दुःखे सरली,
पेला सरला
रिकामाच मी,
रिकामाच तो
बाकी उरला...

या पेल्यातून
कधीच आता
काहीही मी
पीतच नाही...

जरी ठाकली
समोर दुःखे
तरि मी त्यांना
भीतच नाही...