पुसते हळूच

पुसते हळूच

चुका सांडल्यात
नाही कशी म्हणू?

एक एक करून,
वेचते हळूहळू!!

टोचते एखादी
येतं पाणी.

पाणी आल्यावर
नाही कस म्हणू?

पुसते हळूच
हसू आणून.

स्वाती फडणीस.......................... १०-०२-२००८