असेही कविपण

रोज येतात आंबट ढेकरा
नाही होत पचन
पोट मुरडता मुरडता
सरतात वायुदिवस

अंगाखांद्यावर
चढते अग्निमांद्य

कळा लागतात
पोटाला
अन
परसांत
धांवता धावता
होते कविता!!