राजसा, जवळि जरा बसा
कापते खिसा, हळुच मी बाई
लागला तिथे महासेल, करूया घाई
त्या दिशि, पाहिली बरि
साडि जरकारि, पदर झोकात
भलताच रंगला रंग, गुलाबी कात
अन तुम्हि केलि मज खूण
किंमत पाहून, "करू पोबारा"
भलतेच चिकट तुम्हि राव, विरस तो सारा
मी मात्र नाही बसणार,
स्वस्थ, झाले फार, चेव मज आज
जगताचा महिला दिवस, साडि हवि आज.
~श्रीराम