खेळ माझा संपला

आमची प्रेरणा जगदिश खेबुडकर यांची नितांत सुंदर रचना  चंद्र होता साक्षिला

तात होते आत जागे, ना सुगावा लागला,
खेळ माझा संपला, खेळ माझा संपला

घाम फुटला कंप सुटला, मज हिवाळी रात्रिला,
खेळ माझा संपला, खेळ माझा संपला!

घाबरा, बावरा, का मुखाचा चंद्रमा ?
अंग का चोळीसी, रे जीवांच्या संगमा?
आज प्रेमाने तिने मज, प्रश्न होता टाकला !

स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला
गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला
आणि बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला !

-केशवसुमार