(सुवर्णमयीची आगाऊ क्षमा मागुन)
देकार येता दारुचा जल्लोष देहा गाजला
नाही कशाला मी म्हणु? हा जीव होता प्यासला
झाले कधी ना प्राप्त जे मज बाटले अजी लाभले
(होता कसा हरएक खंबा सुखद्रवाने ठासला)
आलास तु खरोखर अन पेले खुशी मी ओतले
जोडीस त्याच्या फाकण्याला खास होता चाखणा
ज्या बंडली होत्या विड्या बळकावुनी मी घेतल्या
धूराप्रमादे खोकऱ्या ठरल्या परंतु त्या मला
घेतो स्वतःला रोज मी थोडीच आता प्राशना
संपून जाता छोटुली ती जीव का कातावला
फुटल्या धरी या बाटल्या, लोळून गेला मद्यपी
माझ्या मनीचा मद्यदा कोठे कळेना लोपला
नाही कशाला मी म्हणु? हा जीव होता प्यासला