[ "एका माणसाची दाढी केवढी लांब सांगू काय ...." या एका बालगीताच्या चालीवर खालील कवीता वाचावी. ]
(वरील बालगीत फाउंटेन कंपनीच्या च्या एका बालगीतांच्या व्हि. सी. डी. मध्ये आहे. ते 'यु ट्युब' वर शोधले तरी मिळू शकेल.)
सांगू काय ?
एका मॉडेलची वस्त्रे केवढी छोटी, सांगू काय ?
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
एवढी छोटी, एवढी छोटी की,
रॅंपवर चालतांना गळून जाय....
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ? ॥ १ ॥
एका चॅनेलाची बातमी इतकी खरी, सांगू काय?
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
इतकी खरी, इतकी खरी की,
राजा हरीश्चंद्रही लाजून जाय ...
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ? ॥ २ ॥
एका क्रिकेटपटूच्या खेळाची महती, इतकी मोठी सांगू काय?
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
इतकी मोठी, इतकी मोठी की...
अनेक अभिनेत्रींशी त्याची काडी जोडून, मोडून जाय ...
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ? ॥ ३ ॥
एका चित्रपटाचे गाणे एवढे आक्षेपार्ह सांगू काय?
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
एवढी आक्षेपार्ह एवढी आक्षेपार्ह की,
सगळीकडे जाळपोळच होवून जाय ...
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ? ॥ ४ ॥
एका अभिनेतत्रीचा फोटो एवढा अश्लील सांगू काय?
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
एवढा अश्लील एवढा अश्लील की,
सगळीकडे वर्तमानपत्रात पुन्हा पुन्हा छापला जाय ...
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ? ॥ ५ ॥
एका मॉडेलच्या चपला केवढया उंच, सांगू काय ?
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
एवढ्या उंच, एवढ्या उंच की,
रॅंपवर चालतांना मॉडेलच पडून जाय....
सांगू काय, सांगू काय, सांगू काय ? ॥ ६॥