(वाट)

आमची प्रेरणा सारंग यांची सुरेख कविता वाट

सांज किंचित किर्र काळोखात जाता
कोण घाली या मनाला साद आता?
दूर गुत्यातून येते हाक आता

पावले जाती कुणाच्या मागुनी ही?
की सुरांचा माग घेती जागुनी ही?
वाजते हे काय या रंध्रात आता?
पाय ही पडती जरा वेगात आता

चाललेली आत ही उन्मत्त गाणी!
गात असते सावळी ठेक्यात राणी!
त्या तिच्या त्या जीवघेण्या हालचाली!
त्या नशेने भरून जाते सर्व खोली

भास-सत्याची अनोखी पुसट रेषा
जाणुनी घ्यावी अशी संकेतभाषा
ती हवीशी वाटते अंधारबोली
अन मनाशी जागते तुषार्त ओली

सांज आता पूर्ण अंधारात गेली
एकट्याने चालण्याची वेळ झाली
शुद्ध न उरली, ना कुणाची साथ आता
निज घराची सापडावी वाट आता!

केशवसुमार