एक अविस्मरणिय "विचित्र" अनुभव भाग ६

पुढच्या दिवशी आम्ही सकाळी परत १० मिनिटे लेट झालो.....सगळेच जण केव्हा ना केव्हा लेट होतच होते, पण त्या दिवशी आम्ही बस मध्ये आल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या..... प ने त्यांना सांगितले असावे.... आम्ही सव्वा शेर.... आम्ही उभे राहून त्या टाळ्यांबद्दल सगळ्यांना "थँक्यू" म्हटलं, आणि आजपासून रोज उशीरा यायच अस ठरवलं आमच्या आधी १  मिनिट जे बस मध्ये चढले ते सुद्धा लेट होते, आणि त्या टाळ्यांना त्यांनी साथ देण्याचं काही कारण नव्हतं.....

बस सुटली... आम्ही "नाँग नूच व्हिलेज" ला चाललो होतो.... तिकडचा "एलिफंट शो" फेमस आहे.... आणि नंतर त्याच जवळ असलेलं रॉक गार्डन पहायला जायचं होतं पण पाऊस पडत असल्याने ते पहायला जाणं नक्की नव्हतं ..... शो पहायला आम्हाला एका ठिकाणी नेलं आणि लगेचच शो संपला की आपण सगळे या ठिकाणी लगेचच भेटणार आहोत असे सांगीतले..... (म्हणजे शो संपला की लगेच धावत ह्या ठिकाणी यायचं) शो फ़ारच छान होता.... शो संपल्यावर आपल्याला हवं असेल तर त्या हत्तीवाल्याला ५० बाथ प्रत्येकी असे देउन हत्तीसोबत फोटो काढता येत होता.... हत्ती आपल्याला सोंडेने उचलणार असा फोटो काढायचा म्हणून आम्ही दोघांचे असे १०० बाथ दिले..... बय्राच जणांना काढायचे होते असे फोटो.... माझा फोटो काढून झाला आणि फी आला... चला चला... सगळे थांबले आहेत.... (वास्तविक पाहता आम्ही ६-७ जोड्या फोटो साठी थांबलो होतो) मग राजेश (आम्हा ६ जणांमधला एक) चिडला.... त्याने सांगीतले.... "हे बघा आम्हाला इकडे फोटो काढायचे आहेत,  आत्ताशी ११ वाजले आहेत, मग घाई कशाला????? पूर्ण दिवसात २ नाहीतर ३ स्पॉट पाहतो आपण १०-१२ नाही कि इतकी घाई तुम्ही करताय...."  फी गपचुप बाहेर गेला.... आणि परत एकदा लोकांनी आमच्या बोलण्याने वेळ मिळाल्याने खुप फोटो काढून ... इकडे तिकडे फिरून एन्जॉय केलं....

हत्तीसोबत ... तिकडे असलेल्या एका मोठ्ठ्या वाघासोबत फोटो काढून आम्ही बाहेर आलो... पाऊस थांबला होता ... ११.१५ वाजले होते..... प ने बोलायला सुरुवात केली.... आपण ह्याची काळजी घेतली पाहीजे की आपल्यामुळे दुसय्रांना त्रास होता कामा नये.... लगेच बाहेर यायचं ठरलं होतं तरी काही लोकांनी उशीर केला आहे.... इकडे आमचा परत एकदा स्फोट झाला.... निखिल (आम्हा ६ जणांमधला एक) म्हणाला... """हे बघा, जसं आम्ही आधीपासून म्हणतो आहोत तस आपण कुणीही शाळेच्या सहलीला नाही आलोय.... इकडे यायला आम्ही बराच पैसा खर्च केला आहे, आता परत इकडे केव्हा येऊ हे माहीत नाही.... त्यात आम्ही इकडे हनिमून ला आलोय... इकडून परत गेल्यावर आम्ही ठरवलं तरी एकमेकांना आम्ही इतका वेळ देउ शकणार नाही.... आम्हाला शांतपणे एकत्र एन्जॉय करू द्या.... आणि २-३ स्पॉट दिवसात आरामात होतात... इतकी घाइ करायची गरज नाहीये.... आणि केली तरी आम्ही त्याला सपोर्ट करणार नाही....""" परत सगळे खुश... पण बंदुक सतत आम्हीच चालवत होतो..... प ला कळून चुकलं होतं ह्याना आपल्या मर्जीप्रमाणे वागवणं कठीण आहे.....

पाऊस थांबून बराच वेळ झाला होता... आम्ही बस मध्ये बसलो आणि अर्ध्या रस्त्यात आल्यावर कळलं की आपल्याला रॉक गार्डन दाखवणार नाहीयेत..... कारण एक तासाचा प्रवास करून आम्हाला परत जेवायला जायचं होतं..... तेच जेवण.... २ तास येण्याजाण्याचे ....रोज दुपारी मुर्खासारखं हॉटेल मध्ये आणून सोडायचं २ते ६ वेळ हॉटेल मध्ये घालवायचा, पहाटे उठायचं, हे रोजचं झालं होतं....

संध्याकाळी आम्हाला खरेदी साठी एका मॉल मध्ये सोडलं खरेदी साठी.... तिकडे सगळं स्वस्त आहे असं प चं म्हणण होतं..... आणि आम्ही कोरल आयलंड ला ज्या वस्तू घेतल्या होत्या त्याहून ३ पट जास्त किमती होत्या.... परत मॉल ... म्हणजे काहीही बारगेन करता येणार नाही.... आमचे अंदाज बरोबर होते आणि आधीच काही वस्तू घेतल्या होत्या.... ह्या मॉल मधली संध्याकाळ फुकट होती.....

पुढच्या भागात....