आलु मटर

  • ४ मध्यम आकाराचे बटाटे, १ कप सोललेले हिरवे मटार
  • तेल
  • ८ मोठे चमचे घट्ट दही (जास्त आंबट नसावे)
  • १ चमचा हळद, २ चमचे धने पूड, २ चमचे लाल तिखट
  • मीठ, गरम मसाला(ऐच्छिक) चवीनुसार
३० मिनिटे

बटाटे सोलून लहान तुकडे करून घ्यावेत.

ग्रेव्ही तयार करण्याची कृती -
एका भांड्यात दही घ्यावे. त्यात हळद, तिखट, मीठ व धने पूड घालून चांगले एकजीव करावे. 
अजून एका भांड्यात तेल टाकून गॅसवर चांगले गरम करावे. त्यात कांदा घालावा व लालसर होईपर्यंत तळावा. त्यात दह्याची तयार केलेली पेस्ट घालावी व ढवळत राहावे, काही वेळाने ह्या मिश्रणातून लहान लहान बुडबुडे येऊ लागतील. हे मिश्रण थोडे दाट होईपर्यंत ढवळत राहावे. शेवटी चवीनुसार थोडासा गरम मसाला घालावा. खमंग वास सुटला म्हणजे आपली ग्रेव्ही तयार झाली.

पुढील कृती -
बटाट्याचे तुकडे ग्रेव्हीत घालावेत. त्यात २/३ कप अंदाजानुसार पाणी घालून ढवळून घ्यावे व उकळी येऊ द्यावी. बटाटे उकडत आल्यानंतर शेवटी मटार घालून अजून थोडा वेळ उकळी येऊ द्यावी. बटाटे व मटार पूर्ण उकडल्यानंतर गॅस बंद करावा.


 

आपल्याकडे एकंदर दही हे ग्रेव्ही करीता वापरले जात नाही. मी सध्या कामानिमित्त भारताबाहेर आहे, येथे नारळापेक्षा दही सहज व मुबलक उपलब्ध आहे. माझा हा मित्र ही भाजी अशा प्रकारे करतो जी छान लागते.

ह्याच ग्रेव्हीत राजमा (आधी उकडवून), आलु गोबी इत्यादी भाज्या करता येतात. खवय्यान्ना अधिक सागणे नलगे.

माझा राजस्थानी मित्र गौरव माथुर