शाकाहारी बिर्याणी

  • २ वाटी बासमती तांदुळ, १ मुठ शेंगादाणे , १०-१५ मनुका, १ वाटी दुध, ४-५ काड्या केशर
  • मटार, फ़्लावर, श्रावण घेवडा, गाजर
  • व्हेज बिर्यणी मसाला ( एव्हरेस्ट मला आवडतो)
  • खडा मसाला (लवंग, दालचिनी, वेलदोडा, मसाला वेलदोडा, तमालपत्र)
  • १ वाटी दही
  • कांदा आणि टोमॅटो लांब चिरुन, थोडे आलं कुटुन
  • तिखट, हळद, धन्याची पुड
  • पाव वाटी तुप आणि पाव वाटी तेल
दीड तास

व्हेज बिर्यणी करण्याआधी शेंगादाणे आणि मनुका पाण्यात किंवा नारळाच्या दुधात भिजवून ठेवाव्यात, केशर दुधात घालून ठेवावे.

कृती

सर्व भाज्या तिरप्या चिरून, उकडून घ्याव्यात (३/४ शिजू द्याव्यात.).

भात मोकळा शिजवून घ्यावा.

शेंगादाणे आणि मनुका पेस्ट करून घ्यावी.

आता एका पॅन मधे तेल आणि तुप टाकवे, गरम झाल्यावर खडा मसाला, कांदा टाकावा. ब्राऊन झाल्यावर टोमॅटो, आलं घालून परतावे.

त्याला तेल सुटल्यावर, शेंगादाणे आणि मनुका पेस्ट, दही ( लागले तर पाणी,

हव्या तश्या consistancy ची ग्रेव्ही होण्यासाठी ) टाकून medium heat वर ठेवावे.

तेल सुटले की भाज्या टाकून ५ मिनीटे होवू द्यावे.

हया

केरळी मैत्रिण