तुजसारखे प्रेम मला जमलेच नाही...

तुजसारखे प्रेम मला जमलेच नाही,
तुजसारखे प्रेम मला जमलेच नाही... ॥धृ.॥

पाणी जसे धरणाचे प्रेम माझे तसे राही
तुझी प्रेमवृष्टी मात्र दशदिशातून वाही
तुजसारखे प्रेम मला जमलेच नाही,
तुजसारखे प्रेम मला जमलेच नाही... ॥१॥

प्रेम म्हणजे माझे एक शुष्कच बर्फ
ना स्पर्श, ना तृष्णा, सर्वच बेतर्क
तुझे मात्र सर्वच विचित्र
काटेरी जरी झाड, तरी  छाया सर्वत्र
बोचरे होते ऊन तरी झाली नाही लाही
तुजसारखे प्रेम मला जमलेच नाही,
तुजसारखे प्रेम मला जमलेच नाही... ॥२॥

प्रेम म्हणजे माझे एक डोळस आंधळेपण
इंद्रधनुष्यातही दिसे मला काळे काळे वेंधळेपण
प्रेमाला मात्र तुझ्या विविध अंग
इंद्रधनुष्यातही घातलास प्रेमाच आठवा रंग
निराशेच्या दुष्काळात आशेचा इंद्रधनुष्य तू पाही
तुजसारखे प्रेम मला जमलेच नाही,
तुजसारखे प्रेम मला जमलेच नाही... ॥३॥