वेगळ्या वाटा

तुम्ही म्हणता तसा मी वागत नसेनही कदाचित

पण म्हणून मी तुमचा नाही असे नाही.

आणि,तुमच्या मनाप्रमाणे वागलो

म्हणून मि फक्त तुमचाच आहे,असेही नाही!

मी शोधतोय त्या वाटा वेगळ्या ...

पण त्या वेगळ्या आहेत हे ठरवायला

 कुणीतरी हवं आहे...

कदाचित फक्त तेवढ्यासाठीच

तुमची आणि माझी गाठ पडली असेल...

असे नसेलही कदाचित...

कदाचित तुमच्या वाटा वेगळ्या असतील

पण...एकमेकांना वेगळ्या वाटा मिळाव्यात

आणि त्या ठरवल्या जाव्यात

म्हणून तरी आपण एकत्र राहूया!!!