(इतिहास)

आमची प्रेरणा अनिरुद्ध१९६९ यांचा इतिहास

शोधून काढल्या मी गझला जुन्या टनाने
पाडू विडंबने ही आता नव्या दमाने

चुकलेच आज माझे प्रतिसाद टाकला मी
होईल वाद चालू तिरपा  नव्या दमाने

उकरून काढला मी इतिहास हा तिचा अन
आली अनेक लफडी माझ्या पुढे नव्याने

ठाऊक सर्व होते घडणार काय आहे !
गेलो तरी तिच्या मी  होतो घरी धिटाने

खिडकीतुनी तिच्या मी वाकून पाहिले की
थोबाड सजवते ती नक्की किती थराने 

हा ही प्रकार केला बदलून रूप गेलो
गेलोच पण पकडला मग तिंबले  बुटाने

टाळायचे कुणाला, मज हेच आठवेना?
चाळून पाहिल्या मी पोरी क्रमाक्रमाने

ओढून बांधले मी नाडीस या तुमानी
येतेच ती सुटोनी खाली तुझ्या भयाने

आतून येत आहे आवाज हा कशाचा?
पोटात गुरगुरावे अत्ताच हे कशाने?

सोडून टाक "केश्या" होईल त्रास याचा
गझला लिहू नये या  जाली  विडंबकाने!