अशी रंगली पाडवा पूर्वसंध्या...."रंग स्वरांचे"च्या माध्यमातून अहमदनगर ला.

परवा ५ एप्रिल रोजी क्रिडासंकुल,अहमदनगर येथे पाडवा पूर्वसंध्येच्या निमित्ताने "स्वप्नील रास्ते प्रॉडक्शन्स्" प्रस्तुत् "थर्ड बेल एंटरटेनमेंट" निर्मित "रंग स्वरांचे" ह्या मेगा व्हरायटी एंटरटेनमेंट शो चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सीमा देशमुख,मधुराणी गोखले - प्रभुलकर हे गायक अभिनेते, महाराष्ट्र संगीत रत्न फेम प्रसेनजीत कोसंबी, ईंडियन आयडॉल फेम सागर सावरकर, सारेगमप फेम आनंदी जोशी,सारेगमप फेम चैतन्य कुलकर्णी,सारेगमप फेम मंगेश बोरगावकर,सारेगमप फेम विजय गटलेवार हे गायक हास्यसम्राट फेम जॉनी रावत, कलाकार पुष्कर श्रोत्री हे हास्यकलाकार, सगळ्या वहिनींचे आवडते भाउजी "आदेश बांदेकर" सतार वादक समीप कुलकर्णी ह्यांच्यासोबत तबला वादक विवेक कोडिलकर आणि निवेदक स्वप्नील रास्ते सहभागी झाले होते. संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन स्वप्नील रास्ते ह्यांचे होते....

कार्यक्रमाची सुरुवात सर्व कलाकारांनी एकत्र सादर केलेल्या "मराठी पाउल पडते पुढे" ह्या गीताने झाली.... प्रसेनजीत कोसंबी आणि चैतन्य कुलकर्णी ह्यांनी ह्या गीताची बहारदार सुरुवात केली... पहिल्याच गाण्याला उपस्थीत असलेल्या जवळ जवळ ४०००० रसिकांच्या समुहाने भरभरून दाद दिलि आणि कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली...  सीमा देशमुख हिने ऐरणीच्या देवा, गोमू संगतीनं ही गाणी सादर केली... मधुराणी गोखले - प्रभुलकर हिने चांदण्यात फिरताना, डिपाडी डिपांग ही गाणी सादर केली..... प्रसेनजीत कोसंबी ह्याने वाय्रावरती गंध पसरला, मल्हार वारी हि गाणी सादर केली.... सागर सावरकर ह्याने अश्विनी ये ना, हे चिंचेचे झाड ..... आनंदी जोशी हिने रुपेरी वाळुत, आणि अश्विनी ये ना हे द्वंद्व गीत सागर सावरकर ह्याच्यासोबत सादर केले. चैतन्य कुलकर्णी ह्याने हिरवा निसर्ग आणि डिप्पाडी डिप्पांग हे द्वंद्वगीत मधुराणी प्रभुलकर हिच्यसोबत सादर केले.... मंगेश बोरगावकर ह्याने गारवा, राधा ही बावरी ही गीते सादर केली... विवेक गटलेवार ह्याने येगो येगो ये मैना... आणि मल्हार वारी हे गीत प्रसेनजीत सोबत सादर केले.  प्रत्येका गीताची रंगत स्वप्नील रास्ते ह्यांच्या बहारदार कविता सादरीकरणाने आणि दर्जेदार निवेदनाने वाढत होती... 

काही गाणी सादर झाल्यावर रसिकांना सतार आणि तबला ह्याची जुगलबंदी ऐकण्याची संधी मिळाली..... शास्त्रीय रागाच्या सादरीकरणात "तुम दिल की धडकन मे" ह्या हिंदी गीताचा हलकसा समावेश प्रेक्षकांना सुखद धका देणारा होता....समीप कुलकर्णी आणि विवेक कोडिलकर ह्यांची २०मिनिटे चाललेली जुगलबंदी हि स्वप्नील रास्ते ह्यांनि खास कार्यक्रामासाठी आणि खास नगरवासीयांसाठी साधलेला दुग्धशर्करा योग होता...... ह्या जुगलबंदीनंतर काही गाणी सादर केली गेली.... विकत घेतला शाम ह्या बाबुजींच्या गीताने जितकी दाद मिळवली तितकाच प्रतीसाद स्वप्नील रास्ते ह्यांनि सादर केलेल्या गदिमा रचित कविते ने मिळवली. स्वप्नील रास्ते ह्यांची ओघवती भाषा आणि कोणत्याही प्रकारे वही, कागदाचा वापर न करता सादर केलेल्या कविता हा प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय बनला होता...

ह्यानंतर हास्यसम्राट फेम जॉनी रावत ह्यांनी  मंचावर ४५मिनिटे हास्याचे लोट आणले.... त्यांची आगरी भाषेत विनोद करण्याची शैली आणि उत्तम दर्जाचे विनोद प्रेक्षकांची वाहवा घेउन गेले.....  परत काही गाण्यांच्या सादरीकरणानंतर न्रुत्यांगना ज्योती जोशी हिने बहारदार न्रुत्य सादर केले‌.संपूर्ण कार्यक्रमात त्यांनी ३ न्र्युत्ये सादर करून प्रेक्षकांची तारीफ मिळवली.... तसेच पुष्कर श्रोत्री ह्याने विनोदी किस्से सांगून प्रेक्षकांची मने जिंकली..... त्यांनी केलेली निळू फुले, डॉ‌. श्रीराम लागु, दादा कोंडके, देव आनंदह्यांची केलेली मिमिक्री विषेश दाद मिळवून गेली.....  कार्यक्रमाच्य मधल्या भागात आदेश बांदेकर ह्यांनी गर्दीत शिरून अनेक स्त्रियांना बोलते केले..... त्यांनी काही स्त्रियांना प्रश्न विचारून , उखाणे घ्यायला लावल्याने प्रेक्षकांत जणू होम मिनिस्टर रंगला होता असा भास निर्माण झाला...स्वप्नील रास्ते ह्यांनी आदेश बांदेकर ह्यांना काही प्रश्न विचारून त्यांची लहानशी मुलाखत घेतली...कार्यक्रमाच्या शेवटी स्वप्नील रास्ते ह्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अतिशय सुंदर वक्तव्य करून त्यानंतर सर्वांनी जयोस्तुते ह्या गाण्याने कार्यक्रमाचा शेवट केला...

संपूर्ण कार्यक्रमात सर्वच कलाकारांच्या परफॉरमन्स ने वन्स मोअर घेतले....कार्यक्रमाचा दर्जा पाहून नगरवासियांनि स्वप्नील रास्ते ह्यांना आणि अधिकाय्रांना वेळ वाढवून देण्याची विनंती केली.... आणि प्रेक्षकांची हि विनंती मान्य करून अधिकाय्रांनी वेळ वाढवून दिली..... रसिकांच्या भरभरून मिळणाय्रा प्रतीसादामुळे आणि प्रेमामुळे स्वप्नील रास्ते ह्यांनीही कार्यक्रमाची वाढीव वेळ मान्य करून कार्यक्रम पुढे २ तास वाढवला.... ३ तास नियोजीत वेळेचा कार्यक्रम ५ तास चालला....प्रेक्षकांची भरभरून दात मिळवून देणारा हा कार्यक्रम नगर वासियांना पाडव्याची एक अविस्मरणीय आठवण देउन गेला....

कार्यक्रमासाठी संपर्कः स्वप्नील रास्तेः ९८२२४२६२५४


"स्वप्नील रास्ते प्रॉडक्शन्स्"

दुवा क्र. १

 थर्ड बेल एंटरटेनमेन्ट
दुवा क्र. २

विविध कार्यक्रमांचे फ़ोटो

दुवा क्र. ३