घाव नसता भळभळून यावी ,वाहून जाता उरी उरावी ऐसी आठवण
स्पन्दनातून एकेरी साद घुमावी ऐसी आठवण.......
प्राण श्वासतुन पोराका ,व्यकुलालेल्या अगतिक नजरा ,
कळ एकवार काळीज चिरुन यावी ऐसी..
स्पन्दनातून एकेरी ....
वेदना असाह्य परी जखाम ना कोठे ,पापण्यांवर फक्त पाणी दाटे
सांत्वनाने ना भरून यावी ऐसी...
स्पन्दनातून एकेरी ....
दिवा मालवला तरी हृदये जळावे , दग्ध झालेले कुणा कळावे
थंड वार्याची झुलुक तुझा घरून यावी ऐसी...
स्पन्दनातून एकेरी .....
रीते घर,रीते मन रीता देहाचा पसारा , स्पर्शही मज ना ओळखीचा माझा
तप्त जाणीव अंगभर फिरून जावी ऐसी...
स्पन्दनातून एकेरी .....
उध्वस्त होण्याचा छंद जडावा ,जगण्याचाही विसर पडावा
आयुष्याची सय विरून जावी ऐसी...
स्पन्दनातून एकेरी .....