सिंहशोकांतिका... अर्थात् सिंहाची शोकांतिका... (एक नवकविता)

सिंहशोकांतिका... अर्थात् सिंहाची शोकांतिका...

रानात दूरवर कुठेतरी सिंहाने एक डरकाळी फोडली...

नंतर दुसरी, नंतर तिसरी...

असे करत करत सर्व डरकाळ्या फोडून संपल्या. एकही डरकाळी फोडायला शिल्लक राहिली नाही...

मग त्याने विचार केला की ह्या फुटलेल्या डरकाळ्या जोडून परत फोडूयात.

तेवढ्यात त्याला चौथी 'ई' च्या वर्गातल्या फळ्यावरचा सुविचार आठवला, 'तोडणे सोपे, जोडणे अवघड'

म्हणून तो नाक शिंकरून झोपायला निघून गेला...