कुंपण

वाद जुने नामंजूर कुंपणांचे
रक्तपिपासू भेसूर कुंपणांचे

रेष धरेवर आखून तोडण्याचे
ब्रीद म्हणू की दस्तूर कुंपणांचे

रोज नवी प्रेतं भाळतात त्यांवर
रक्त तयांचे सिंदूर कुंपणांचे

रोज किती मृत्यू रक्षणार्थ त्यांच्या
नाव पसरले सर्वदूर कुंपणांचे

पेटवुनी गेले आग मायदेशी
गौर गवंडी या क्रूर कुंपणांचे