उषा

दवबिंदूंना चुंबून घ्यावे

आज उषेला का वाटे?

तिच्यासारख्या रूपमतीला

साजेसे कोणी भेटे?

          प्रीतीची पाऊले लगोलग

          पडावयाची ठरलेली

          सकाळ वेळा टळली तरीही

          त्याच्यातच रमलेली

विस्मय करिती लोक

भूवरी पक्षी गडबडले

म्हणती सारे अजूनही

कसे नाही उजाडले?