सखी मंद झाल्या तारका

सखी मंद झाल्या तारका
आता तरी उठशील का? उठशील का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका

मी स्वप्न होते पाहिले
जागेपणी झोपायचे
अन ढाराढूर घोरायचे
बिनधास्त ते लोळायचे

स्वप्नात मी गेलो निजून
तू टक्क गादीवर बसून
कुदणाऱ्या मेंढ्यांना मोजून
तू रात्रभर गेली दमून

परी सूड दैवाचा बघा
तू गाढ झोपी मी जागा
मेंढ्या साऱ्या निजल्यात का?
ही रात्र साली संपेल का?

झाला प्लॅन माझा फुसका
रात्र गेली तू उठशील का?

सखी मंद झाल्या तारका
आता तरी उठशील का? उठशील का?

सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका

 ............... "काय कटकट लावली आहे रे सकाळी सकाळी. शांतपणे झोपूही देत नाही मेले.........