(साडीची ही घडी...)

यशवंत देवांनी रचलेली लतादीदींच्या आवाजातली एक सुंदर रचना 'जीवनात ही घडी... ' ऐकल्यावर राहावलं नाही आणि...

साडीची ही घडी अशीच राहू दे
धोब्याच्या दृष्टीला कधी न येऊ दे
साडीची ही घडी... ॥ध्रु.॥

जन्मदिनी घेतला गं शालू देखणा
आवडला घोड्याला तोच झोळणा
शालू तो मजकडे पुनश्च येऊ दे ॥१॥ साडीची ही घडी...

कपडे फाडायाचा छंद लागला
लज्जेचा ज्ञात नाही अर्थ त्याजला
चोरीचे दुष्टस्वप्न भंग होऊ दे ॥२॥ साडीची ही घडी...

फाडू दे अशीच त्यास उंची कापडे
झाकुनी अशीच ठेवू नित्य झापडे
वापसीत कपड्यांच्या धन्य मानू दे ॥३॥ साडीची ही घडी...

चैत रे चैत आणि हर्षल खगोल

मूळ गाणे मराठीवर्ल्ड.कॉम येथे मिळेल. (अनुक्रमांक ६८१)