तुझी पत्र..........

कधी कधी अस होत

कुणीतरी बरोबर हवं असत,

सगळं काही असून ही,

मन काहीतरी मागत असत

शब्दांनी ते मीळत नाही

वाक्यांनी ही जुळत नाही

कुणाला कस सांगावं

तेच मला कळत नाही

तेव्हा तुझी पत्र आधार होतात.

अडचणीच्या वाटा माझ्या आपसूकच मोकळ्या होतात.

मग ,शब्दांना शब्द मिळतात

वाक्यांना वाक्य जुळतात

कुणाला कस सांगावं असा प्रश्न उठत नही

कारण तेव्हा तुझी पत्र माझ्या सोबत असतात.

कळकळून माझी दुःख मी

तुझ्या पत्रांना सांगत असते

माहेरचा खांदा म्हणून मग

उणीवा माझ्या पूर्ण होतात.................