आलू पराठे

  • ४/५ मध्यम आकाराचे बटाटे
  • एका पेराएवढं आलं, २/३ लसूण पाकळ्या, २/३ हिरव्या मिरच्या
  • मीठ चवीनुसार, तेल
  • मावेल तेवढी कणिक
दीड तास
९ ते १० पराठे

बटाटे उकडून घ्या. साले काढून कुस्करा. आले लसूण मिरचीचे वाटण करून त्यात घाला. मीठ व चमचाभर तेल घाला. मावेल तेवढी कणिक घाला. पाणी अजिबात घालू नका. जरा घट्टसर मळा, गोळा जास्त वेळ न ठेवता लगेचच मध्यम आकाराचे पराठे लाटा.
लाटताना पिठी जरा जास्त लागते नाहीतर ते पोळपाटाला चिकटतात.
भाजताना दोन्ही बाजूंनी तेल सोडा.
दही+चाट मसाला+तिखट+ मीठ याबरोबर हे पराठे छान लागतात. जोडीला टोमॅटो केचप किवा नारळाची चटणीही झकासच!

स्टफ्ड आलू पराठे आपण नेहमी करतो पण ते जरा वेळखाऊ आणि किचकट काम असते. सारण न भरताही आलूपराठे चांगले होतात. वेळ थोडा कमी लागतो आणि कमी किचकट काम!

.