कीस

मिलिंद फणसे यांची पीस आणि केशवसुमारांची (पीस) या रचना वाचून आम्हाला पिसे लागले नसते तरच नवल. त्या वेडाच्या भरात आम्ही म्हटले :

पाडताना गीत का अडलीस तू ?
शब्द वेचून काढ त्यांचा कीस तू

मेद वाढू लागला देहातला
चालताना फार डुचमळलीस तू

सर्द झालो ऐकुनी आरोह अन्‌

शोधता अवरोह धडपडलीस तू

विस्कटाया लागली आहे घडी

तापवाया घे पुन्हा इस्त्रीस तू

शब्द प्रेमाचा कसा पाळू सखे ?

घातली आतून कडी खोलीस तू !

 
फार का खातेस दाणाकूट तू ?
तूप भातावर !? किती सुटलीस तू !

या अशा पाडून कविता पोरकट
खोडसाळा, मूर्खता केलीस तू