भोकराचे लोणचे

  • पाव कि. भोकरे
  • अडीच मोठे चमचे भरून[शीग लावून] लाल तिखट, दिड चमचा मेथीची डाळ, ७-८ चमचे मोहरीची पूड, ३ मोठे चमचे मीठ,
  • ३ चमचे हळद, १ चमचा हिंग, २ पळ्या तेलाची फोडणी
  • भोकरे बुडतील एवढे पाणी व त्यात १ चमचा मीठ
३० मिनिटे
२-३ जणांना

प्रथम एका पातेल्यात मीठ घातलेले पाणी घेऊन, त्यात भोकरे स्वच्छ धुवून घ्यावीत.

मग ती पुसून कोरडी करावीत. मग या भोकरांतील बिया काढून टाकाव्यात. मसाल्याचे

सर्व साहित्य, मीठ, फोडणी एकत्र करून कालवून घ्यावा व भोकरांत भरावा‍.

झाले तुमचे लोणचे तयार!

खार लवकर सुटावा यासाठी य लोणच्यात १ कैरीच्या फोडी घालाव्यात, त्यामुळे चव थोडी

वेगळी पण छान येते.

कै. आई