चटपटीत बटाटा भाजी

  • २ ते ३ मोठे उकडलेल्या बटाट्याच्या फोडी
  • पाव चमचा जिर
  • २ चमचे साखर
  • अर्धे लिंबू
  • चवी पुरते मिठ
  • दिड चमचे तुप
१५ मिनिटे
२ जणांसाठी


बटाटे उकडुन त्याच्या फोडी कराव्यात. भांड्यात तुप घालुन जिर फोडणीला घालावे. मग त्यात मिरची पुड घालावी व लगेच उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालुन ढवळावे. नंतर वरुन मिठ, साखर घालावी, लिंबू पिळावा आणि परतून ५ मि. वाफ आणावी.

एकदम चटपटीत लागते ही भाजी.

स्वतः