-कलियुग येईल,
रक्त-रक्त वैरी होइल..
झाले ईश्वरा अगदी तसेच झाले
तुझ्या म्हणण्याप्रमाणे, शब्दांप्रमाणे
आणि त्याचे पुरावेही कधीच मिळाले
पण सांग हे कुठवरं चालणार?
मी तरी कुठवर मलाच मारणार?
रे ईश्वरा हा सवाल नाही
हा आकांत आहे माझा
माझ्यातल्या माणसाचा
आज उत्तर नको मला
मला तुझा नवा अंश हवाय..
तुझा कलयुगी वंश हवाय...
त्या जुन्या गोष्टि कधीच गंजल्यात
गर्द, किर्र तिमिरात रंगल्यात
त्याच उग्र त्या कुंद हवेने
इथं सारखा श्वास कोंडतो
ज्या हातात केली माणुसकी
त्याच हातांनी मी विश्वास सांडतो
साकळतो काळ पुन्हा घात
पुन्हा रक्त, आक्रोश, आकांत
पळभर इथं वादळ उठतं
होते पुन्हा आकाशही शांत
प्रेम, नातंही हेही फ़क्त व्यर्थ बात
आज शब्दालाही काहीच मोल नाही
नजरेनेही हे सहज पहावे
खरंच रे मन ईतकंही खोल नाही
या मनाचीही रचना तुझीच
रचनेमागची ईछ्चाही तुझीच
आज त्याच ईछ्चेने जागा हो
बदलुन टाक तुझी सुत्र, तुझे नियम,
दे पुन्हा शाती, दे फ़क्त संयम
खरच ईश्वरा या हाकेला साद दे.....
या युगाचा आता अंत नको पाहु
आज मला नवा तु धर्म दे.....
घे ईश्वरा, ईश्वरा पुन्हा जन्म घे.....
--सचिन काकडे [ मे २3,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”