देत जा !

चालताना देत जा हात माथी घेत जा
काय आहे न्यायचे वाटुनी वाटेत जा

तोकडे वाटेल तेव्हा किनारी ये कधी
सागराला पाहताना मनाला बेत जा

सोयरा नाही कुणी हात द्याया यायचा
टाकुनी खांद्यावरी तू स्वतःचे प्रेत जा

वादळे भूकंप लाटा सुनामी धावती
संपण्याचा माणसा समजुनी संकेत जा

दुःख ठरल्यासारखे भेटते वळणावरी
क्षण सुखाचे वेचुनी सोबतीला घेत जा