येथे...

पाखरांना पिंजऱ्याचा सोस येथे
मोकळे आभाळ पडले ओस येथे

रिक्त प्याल्यांच्या अशा कां आज रांगा?
काल होते अंगुराचे घोस येथे

कागदाची नावसुद्धा भ्यायली ना
व्यर्थ होते, वादळा, हैदोस येथे

मानली तर अंतरे असतात येथे
मोजली तर 'मैल' किंवा 'कोस' येथे

पाहिजे ते,पाहिजे त्याला मिळेना
हाच आहे, नेहमी अफसोस येथे

.

(जयन्ता५२)